आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर भूखंड घोटाळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाचवण्यासाठी सुशांत सिंह प्रकरणावरून माझ्यावर आरोप केले जात आहेत. मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी आज केला.
राहुल शेवाळेंवर मला काडीमात्र बोलायचे नाही. शेवाळेंचे लग्न ठाकरेंनी कसे वाचवले, हे आम्हाला माहीत आहे, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.
भूमिका केली स्पष्ट
सुशांत सिंह हत्याप्रकरणी आज लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी तपासात तफावत असल्याचे सांगत आदित्य ठाकरेंवर बोट ठेवले. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या घाणीत जायचे नाही
आदित्य ठाकरे म्हणाले, मला त्या घाणीत जायचे नाही. ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नाही त्यांनी आमच्यासोबतही गद्दारी केली. त्यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. चाळीस गद्दार व मित्रपक्ष सर्वच एकमेकांना अडचणीत आणत आहे. एनआयटीचा घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना वाचवायचे म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहेत.
माईक बंद केले गेले
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांबद्दल महाराष्ट्रात तुफान राग आहे. मुंबईत विधिमंडळाचा राज्यपालांनी अपमान केला. त्यांनी महापुरुषांबद्दल वक्तव्य करून अपमान केला. हा राग आता वाढलाय. आम्ही कर्नाटकाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. एनआयटीचा विषय, सीमावादावर बोलताना आमचे माईक बंद केले.
मुख्यमंत्र्यांची चौकशी व्हावी
आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी खरे तर राजीनामा द्यायला हवा. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आमच्याविरोधातील आरोपाचा खटाटोप आहे. चौकशी हीच व्हावी की, मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केला की, नाही. दुसरी चौकशी ही व्हावी की, राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न का होतो?
सरकार महाराष्ट्रद्वेषी
आदित्य म्हणाले, हे सरकार महाराष्ट्रद्वेषी आहे. राज्यपाल जिथे बोलत आहेत. त्यांना माफी मागायला का लावत नाही. राहुल शेवाळेंना मी काडीमात्र किंमत देत नाही. त्यांचे लग्न आमच्या घराण्याने कसे वाचवले यात मला जायचे नाही. पर्सनल लाईफमध्ये मला जायचे नाही. कारण ते माझे संस्कार नाही. मी त्यांच्यावर घाणेरडे बोलणार नाही. काही लोकांचे मन खूप काळे असते त्यात मी जाणार नाही. आम्ही चांगल्या लोकांसोबत राहतो.
रियाला सुशांतच्या आधी 44 काॅल्स! - शेवाळे
लोकसभेत निवेदन करताना राहुल शेवाळे म्हणाले, रिया चक्रवतीच्या मोबाईलची पडताळणी केली आणि त्यात महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याचे अर्थात 'ए यू'चे नाव आले हे खरे आहे का? रिया चक्रवर्तीला सुशांतच्या आधी 44 काॅल्स ए यु चे आले होते. एयू म्हणजे लीगल अन्यया उद्धव म्हणतात परंतु, बिहार पोलिसांनी तपास केला तेव्हा आदित्य उद्धव. आदित्य उद्धव ठाकरे हे नाव आले होते.
तपासात तफावत - शेवाळे
राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले, एयू म्हणजे अनन्या उद्धव नसून आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांच्या तपास सांगतो. याउलट मुंबई पोलिसांचा तपास वेगळा आहे. सीबीआयचा लोकांच्या मनात प्रश्न आहे. त्यांना सत्यता जाणून घ्यायची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.