आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका:राज्य सरकार केवळ दिल्लीचे ऐकते; जनतेचे काही ऐकले जात नाही, हे महाराष्ट्राचे दु:ख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. राज्यातील महिलांचे आणि युवकांचे अनेक प्रश्न आहे, मात्र त्यांचे ऐकले जात नाही, राज्य सरकार केवळ दिल्लीचे ऐकते हीच महाराष्ट्राची खंत आहे असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

राज्य सरकार ना शेतकऱ्यांचे ऐकते आहे, ना तरुणांचे ना महिल्याचे प्रश्न ऐकून घेते केवळ दिल्लीचे ऐकण्यात सरकार व्यस्त आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला आहे. राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. तर जीडीपी घसरण्यासाठी 6 महिन्यांपूर्वी केळीचे साल टाकले कुणी असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे राज्यात ना कोणती नवी गुंतवणूक आली नाही, डावोस येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व इतर पन्नासेक लोकांची वरात जाणार आहे. मात्र काही एमओयू आताही सही करण्यास तयार आहेत, मात्र केवळ तिकडून गुंतवणूक आणली हे दाखविण्यासाठी त्यांना थांबवून ठेवण्यात आले असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

रा्ज्यात गुंतवणूक करण्यास कुणीही तसार नाही, कारण राज्यात एक सीएम आणि दुसरे स्पेशल सीएम आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. राज्यातील वातावरण खराब आहे, यांनी धोके दिले आहेत ते लवकरच अपात्र ठरतील असे सांगतानाच हे सरकार लवकरच पडणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. पण पुढचे सरकार जे येईल् ते महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करणारे असावे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तर राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री हे त्यांचे काम योग्य पद्धतीने करत आहे. आपले मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन महाराष्ट्रासाठी काही मागतच नाही असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...