आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजेटमध्ये महाराष्ट्रासाठी एकही मोठा प्रकल्प नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. तर मुंबईकरांचा पैसा खर्च करताना स्कायवॉकसाठी 75 कोटींची तरतूद कशाला? असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प हा आज सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प हा तब्बल 52 हजार कोटींचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 6670 कोटी जास्त आहे. यावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई मनपाचे जवळपास साडेचारशे कोटी रुपये आपण वाचवू शकलो असे सांगतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या बजेटवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, गुजरात, कर्नाटकासह जिथे जिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या ठिकाणी जेवढया प्रमाणात दिले त्या प्रमाणात महाराष्ट्राला काही मिळाले नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
मुंबई मनपाला पैसे द्यावे
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यात जे सुरू आहे, त्यावरून आपण मोरल, लिगल आणि फायनाशियल दिवाळखोरीच्या दिशेने जात आहोत, असे दिसत आहे. राज्य सरकार साडेसात हजार कोटी मुंबई महापालिकेला देणे आहे, आता शिंदे- फडणवीस यांचे सरकार असून त्यांनी मुंबई मनपाला हे पैसे द्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
आम्ही अनेक प्रकल्प केले
आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबई मनपाला येणाऱ्या एफडीच्या व्याजातून आम्ही अनेक प्रकल्प केले.शिवसेनेने बजेट योग्य करत जनतेचा पैसा वाचवत महापालिका आम्ही फायद्यात आणली आहे. जेव्हा शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली तेव्हा मुंबई मनपा तेव्हा पालिका खर्चात होती, असे सांगायला ते विसरले नाहीत. तर मुंबई पालिकेच्या एफडीबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, किती पैसा तुम्ही वापरत आहात, ते सांगावे असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न
यापुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या बजेटमधून मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न होत आहे.कंत्राटदारांसाठी त्यांची उधळपट्टी सुरू आहे. मात्र, सामान्य जनतेचा फायदा होत असेल तर त्यांना ते नको आहे, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. 500 स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांचा कर आपण रद्द केला. या करातून येणारे उत्पन्न कमी झाले आहे, आम्ही केलेल्या वचनपूर्तीवर त्यांनी एकप्रकारे आरोप केला आहे.
मुंबईत लोकशाही आहे?
आदित्य ठाकरे म्हणाले की, महसूल कमी झाला असताना खर्च कमी करण्याची गरजही त्यांनीच व्यक्त केली आहे.जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. बजेट मांडणारही तेच आणि मंजूरही तेच करणार, हे लोकशाहीला धरून आहे का? 2500 कोटीत होणारे रस्ते 6500 कोटींमध्ये होत आहे. स्काय वॉकची गरज आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या 25 वर्षात शिवसेनेने जनतेचा पैसा जपून वापरला, तसेच आताही हा पैसा जपून वापरला पाहिजे. हे सर्व सुरू असताना मुंबई लोकशाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो. असेही त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंना आव्हान
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिले आहे. मी माझ्या वरळी मतदारसंघातून राजीमाना देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा, तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते एका जाहीर सभेत बोलत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.