आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Aditya Thackeray Role Should Be Investigated In 1000 Crore Scam Of Madh Studio, Kirit Somayya Demands CM Eknath Shinde, Devendra Fadnavis

1000 कोटींचा घोटाळा:आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी करा; किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1000 कोटींच्या मढ स्टुडिओ घोटाळ्यात मविआ सरकारचे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची चौकशी ताबडतोब सुरू करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मढ स्टुडिओ घोटाळाप्रकरणी सरकारने मुंबई पालिकेचे अधिकारी व पर्यावरण अधिकारी यांचाही चौकशी करावी, अशीही मागणी सोमय्यांनी केली आहे.

चौकशीची अधिवेशनात घोषणा

पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटले आहे की, मढ मार्वे, मालाड येथील 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने गेल्या विधानसभा अधिवेशनात केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यावरण सचिव, महाराष्ट्र कोस्टल झोन पर्यावरण प्राधिकरणचे अध्यक्ष आणि सचिव यांनी अनधिकृत रित्या या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली व स्टुडिओचे रक्षण केले आहे.

पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1000 कोटी रुपयांची आहे. घोटाळ्यात महाविकास आघाडी सरकारचे मुंबईचे दोन्ही पालक मंत्र्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदावरून मुक्त करावे
किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने अशा 49 स्टुडिओंना भ्रष्ट पद्धतीने परवानगी दिल्या. ऑक्टोबर 2022 आणि ऑक्टोबर 2024 पर्यंत हा भ्रष्ट कारभार करण्यात आला. या घोटाळ्यांची चौकशी ताबडतोब सुरू करावी आणि चौकशी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून मुक्त करावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...