आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे शिंदे गटावर आक्रमक:कुटुंबाचे नाते तोडून पाठीत खंजीर खुपसला, गद्दारी केली तर गद्दारच म्हणणार

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गद्दारी केली तर गद्दारच म्हणणार, भाऊ असते भाऊ म्हटले असते. पण, कुटुंबाचे नाते तोडून पाठीत खंजीर खुपसून ते गेले, अशी खरमरीत टीका शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली. तसेच खरे मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. विधानभवानाबाहेर ते माध्यमांशी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर आज दुपारी 12.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, न्यायदेवतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. बंडखोरांनी केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठितच खंजीर खुपसला असे नव्हे तर पूर्ण जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्हालाल न्याय मिळेल, असा विश्वास आहे.

पुढे ते म्हणाले की, मंत्रीमहोदय (शंभूराज देसाई) पायऱ्यांवर म्हणाले की 50 खोके तुम्हाला हवे आहेत का, त्या 50 खोक्यांमध्ये होते काय, आज आम्ही हाहात 50-50 बिस्किटे घेतली आहेत, त्यांच्या हातात अजून काही होते का ते गुवाहाटीला का गेले, हा मोठा प्रश्न आहे, या राज्याचे जे तात्पुरत्या सरकारचे गद्दार सरकारचे मंत्रीमहोदय आहेत. त्यांचे वक्तव्य देशाने बारकाईने ऐकायला हवे, अशा मस्तीत एखादा मंत्री विधानभवनाच्या पायऱ्यांवर कोणाला ऑफर देऊ शकतं का, याचाही विचार जनतेने केला पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आम्ही केली आहे. पण या तात्पुरत्या सरकारने कुठेही जनतेच्या प्रश्नांना हात घातला नाही. प्रत्येक गोष्ट ही राजकीय दृष्ट्रीकोनातून झाली आहे. लोकांना मदत झालेली नाही. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण, ही मदत अद्याप दहीहंडीच्या मंडळापर्यंत पोहचलेली नाही. अनेक मंडळांनी माझ्याकडे 5 टक्के नोकऱ्या शासनात कशा मिळणार याबाबत चौकशी केली. तसेच दहीहंडीला खेळ म्हणून मान्यता दिली. पण, त्याबाबत अद्याप जीआर निघाला नाही. ही नुसती धुळफेक होती का, यावर तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

शिवसेनेत उभी फूट
शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेपुढे मोठं पक्षसंकट उभे ठाकले आहे. बंडखोरीमुळे पक्षावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत.

बातम्या आणखी आहेत...