आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा:सभांमधून ताकद दाखवण्याचा दिवस, आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचंड राजकीय गदारोळात आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी सभांमधून ताकद दाखवण्याचा दिवस असणार आहे. आज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सेना भवनात दुपारी 1 वाजता बोलावली आहे. त्‍याचबरोबर आदित्य ठाकरे हे देखील सांयकाळी बिर्ला मातोश्री सभागृहात सर्वसामान्यांना संबोधित करणार आहेत. या सभांमध्‍ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुध्‍दा उद्यापासून राजकीय रणकंदनात उतरणार आहेत. सकाळी 11 वाजता ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार आहेत.

मतदारसंघात मेळावे घ्या- शिंदेंचे आदेश
गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटाची बैठक संपली. आमदारांना आपापल्या मतदारसंघात मेळावे घेण्याचे आदेश शिंदे यांनी बैठकीत दिले. सभेतून बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे न्या. आम्ही शिवसेनेत आहोत. स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र या असेही ते म्हणाले.

आमदारांना सभा घेण्याच्या सूचना
लोकांना सांगा की तुमची भूमिका पहिल्यापासून हिंदुत्वाची आणि मराठीची आहे. उद्धव ठाकरे यांनी काल विभागप्रमुखांची बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आता एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंपाठोपाठ आपल्या आमदारांना सभा आणि रॅली काढण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...