आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अफगाणी विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरेंचा दिलासा, शालेय शुल्कात सवलत देणार, व्यथा केंद्राकडे पोहचवणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाण विद्यार्थी शिष्टमंडळाने घेतली राजशिष्टाचार मंत्र्यांची भेट

अफगाण विद्यार्थ्यांचे नातेवाईक संपर्काबाहेर असल्याने राज्यात शिक्षणासाठी आलेले हजारो विद्यार्थी हवालदिल झालेले आहेत. मदतीची अपेक्षा करत अफगाण विद्यार्थ्यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, तुम्हाला महाराष्ट्रात काही त्रास होणार नाही याची खात्री घेतली जाईल,’ असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणारे अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात ठाकरे यांची भेट घेतली. पुणे विद्यापीठाअंतर्गत तीन हजारांहून अधिक अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या नातेवाइकांशी कोणताही संपर्क होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालया मार्फत त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करून दिला जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क राहिले असेल, त्या विद्यार्थ्यांना सवलतही दिली जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले.

‘महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल. मात्र, त्यांच्या पालकांना भारतात आणण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर आपण परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून मार्ग काढणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ‘अफगाण विद्यार्थ्यांचा व्हिसा आणि शरणार्थी स्टेटसबाबत काही मागण्या होत्या. त्या आम्ही ऐकून घेतल्या. या मागण्या पुढे केंद्र सरकारकडे पाठवल्या जातील.

अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
काही दिवसांपासून अामचा कुुटुंबीयांशी संपर्क नाही आम्ही पाच हजार विद्यार्थी शिकत आहोत. आमची कुटुंबे अफगाणिस्तानात आहेत. अफगाणिस्तानात वीजपुरवठा बंद झाला आहे. अामचा कुटुंबीयांशी गेल्या काही दिवसांपासून संपर्क झालेला नाही. आदित्य ठाकरेंनी आमची मागणी पुढे सांगू असे आश्वासन दिले आहे. भारतात राहणाऱ्या मुलांकडे पैसे नाहीत. आम्हाला मदत हवी आहे, अशी व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली.

बातम्या आणखी आहेत...