आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांच्या राज्यात टक्केवारीला स्कोप नाही:म्हणून आदित्य ठाकरेंचा थयथयाट; नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई मनपातील कामावरुन युवासासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात वाद पेटला आहे. आदित्य ठाकरेंनी रस्ते कामावरुन राज्य सरकारवर टीका केली, याला प्रत्युत्तर देताना शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात टक्केवारीला स्कोप नाही, म्हणून आदित्य ठाकरेंनी थयथयाट केला आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

युवराजांचे आरोप तथ्थहीन

आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना राणे म्हणाले की, राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेत टक्के खाण्याचा काही स्कोप राहिलेला नाही. ही कल्पना आदित्य ठाकरेंना चांगल्या प्रकारे आली आहे. राज्यातील शिंदे-​फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर मुंबईसाठी देण्यात आलेल्या 1700 कोटी रुपयांच्या निधीचे मुंबईतील 227 प्रभागांमध्ये समान वाटप करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सरकारच्या या भूमिकेमुळे आता मुंबईकरांना न्याय मिळणार आहे. युवराज आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार आणि फडणवीस शिंदेंवर केलेले आरोप निराधार असून त्यात काहीही तथ्य नाही.

काय म्हणाले होते आदित्य?

मुंबई महापालिकेत सध्या टेंडर, ट्रान्सफर अन् टाइमपास सुरू आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासन कोणत्या तरी वेगळ्याच आदेशावर चालते आहे. मुंबईकरांच्या पैशावर डोळा ठेवून सगळे सुरू आहे, असा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला. राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरील वक्तव्यावर पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. पन्नास-शंभर वर्षांपूर्वीच्या इतिहासावरून भांडणे करत बसण्यापेक्षा आपण चांगल्या भविष्यासाठी भांडले पाहिजे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

बातम्या आणखी आहेत...