आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत रोड शो करण्याची काय गरज?:आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपीमध्ये सुमारे १७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी बुधवारी-गुरुवारी मुंबईतील हॉटेल ताज येथे देशातील मोठ्या उद्योगपतींची भेट घेतली. यात मुकेश अंबानी, सीआयआय तथा बजाज फिनसर्व्ह लि.चे अध्यक्ष संजीव बजाज, कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक, एसबीआयचे सीएमडी दिनेश कुमार खारा, एसआयडीबीआयचे अध्यक्ष आणि एमडी शिव सुब्रमण्यम रमण, एक्झिम बँकेच्या एमडी हर्षा बांगारी, हिरानंदानी ग्रुपचे सीईओ हिरानंदानी यांच्यासह बॉलीवूडमधील मान्यवरांचा समावेश आहे.

त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. आदित्यनाथ यांनी मुंबईत राजकारण उद्योग करू नये, मुंबईतून कुणीही बॉलीवूडला कुठेही नेऊ शकत नाही, असा इशारा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ज्या राज्यात धर्माच्या नावावर सरकार चालवले जाते तेथे कोणता उद्योगपती गुंतवणूक करण्यास धजावेल? ‘योगीजींचा दौरा उद्योजकांच्या गाठीभेटींसाठी की मतदार आकर्षित करण्यासाठी?’ यावर भाजपने खुलासा करावा, असे राष्ट्रवादीने सांगितले.

अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ला जमीन
योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ बांधण्यासाठी जमीन देण्याचे मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही सांगितले. त्यावर योगींनी समाधान व्यक्त करत यूपीच्या वतीने आमंत्रित करून अयोध्येला आवर्जून भेट द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...