आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी संपकऱ्यांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची 2 दिवसांची पोलिस कोठडी आज संपली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गिरगाव कोर्टात हजर केले. सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांची पुन्हा कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी व सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली. त्यानंतर सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनीही न्यायालयात बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पुर्ण झाल्यानंतर आता या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला असून गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची (13 एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयात याच प्रकरणात आता वकीलांचा युक्तिवाद झाला. सरकारी वकील प्रदीप घरत न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी सदावर्तेंना 11 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. यानंतर आता सदावर्तेंकडून विधिज्ञ कुलकर्णी बाजू मांडली. तत्पुर्वी प्रदीप घरत यांनी महत्वपुर्ण बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ती अशी की, सदावर्तेंना हल्ल्याच्या दिवशी नागपूर येथून सदावर्तेंना 11.30 वाजता व्हाट्स ॲप काॅल आला होता. दुसरा कॉल 1.38 वाजता आला होता. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे आढळले आहेत. पवारांच्या घरावरील हल्ल्याचा सुनियोजित कट होता. 2.42 वाजता पत्रकारांना निरोप गेला. या हल्ल्याची सर्व माहिती सदावर्ते यांना होती. चंद्रकांत सुर्यवंशी हा महत्वाचा संशयित आरोपी अद्याप फरार आहे. सुर्यवंशी हा MJT यु ट्युब पत्रकार आहे. मोहम्मद सादीक शेख हाहीसंशयित आरोपी आहे. सावधान शरद सावधान असे बॅनर होते. सदावर्ते विजयी उत्सव बारामतीत साजरा करणार होते. या सर्व बाबींचा तपास करायचा आहे. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून 530 रुपये प्रमाणे दीड कोटी रुपये जमा केले. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती दिली आहे. नागपूर येथून सदावर्तेंना कुणाचा कॉल आला याचा तपास करायचा आहे. अशी बाब घरत यांनी न्यायालयापुढे मांडली.
या मुद्द्याकडेही वेधले न्यायालयाचे लक्ष
सदावर्तें यांच्या तर्फे न्यायालयात कुलकर्णी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. यात 530 रुपये गोळा केल्याची तक्रार एसटी कर्मचाऱ्यांनी दिली का? असा प्रश्न विचारत मग येथे याचा उल्लेख कशासाठी हा मुद्दाही त्यांनी न्यायालयासमोर मांडला.
गिरीश कुलकर्णी न्यायालयात मांडलेले मुद्दे
एसटी संपकऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला होता. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याच्या आरोपाखाली अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
आंदोलकर्त्यांनी घातला होता गोंधळ
न्यायालयाने एसटी कामगारांना हजर राहण्यास सांगितल्या नंतर एसटी कर्मचारी संतप्त झाले. शरद पवार यांच्यामुळेच एसटी विलीनीकरण झाले नाही असे संपकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या आंदोलकांनी शरद पवार यांच्या मुंबई निवासस्थानी सिल्व्हर ओकवर मोठा गोंधळ घातला होता. त्यात अनेकांनी पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलफेक करत निषेध केला होता. त्यानंतर पोलिसांनी सदावर्तेसह अन्य 109 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांना शनिवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार आज त्यांची पोलिस कोठडी संपणार आहे. मात्र, सदावर्ते यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी आज न्यायालयात पोलिस करणार आहे. त्यामुळे आज सदावर्ते यांना दिलासा मिळतो की, त्यांच्या कोठडीत वाढ होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.