आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या टार्जनचा झाला अपघात:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कारची दुर्घटना, टार्जन फेम अभिनेते हेमंत बिरजे, त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'टार्जन' या बॉलिवूड चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा रात्री उशिरा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्यावर अनेकवेळा पलटी झाली. यामध्ये हेमंत आणि त्यांची मुलगी रेश्मा जखमी झाले आहेत. हेमंत हे मुंबईहून पुण्याला जात होते.

नवी मुंबईजवळील उर्से गावात हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी हेमंत यांच्या सोबत आमना आणि मुलगी रेश्मा याही कारमध्ये होत्या. हेमंत गाडी चालवत होते. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन काही काळ बंद करण्यात आली होती. महामार्ग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून वाहन बाजूला करून सर्व जखमींना रुग्णालयात नेले.

एकेकाळी सिक्यूरिटी गार्डचे काम करत होते हेमंत
हेमंत हे मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मग एके दिवशी दिग्दर्शक बब्बर सुभाष यांची त्याच्यावर नजर पडली. सुभाष आपल्या चित्रपटात असा हिरो शोधत होते, मग तो दिसायला मजबूत असावा आणि सोबत लाजरा देखील. त्यांच्या चित्रपटाच्या नायकासाठी आवश्यक असलेले सर्व गुण दिग्दर्शकाने हेमंतमध्ये पाहिले. त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली आणि हेमंत यांनी घाईघाईने होकार दिला. 55 वर्षीय हेमंत यांनी किमी काटकरसोबत 'टार्जन' चित्रपटातून पदार्पण केले. किमीचे बॉलिवूड करिअर चांगले होते. त्यांनी अनेक हिट चित्रपट आणि सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली. पण हेमंत यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसे काम मिळाले नाही.

मिथुनसोबत काही चित्रपटात काम केले
हेमंत यांनी मिथुन चक्रवर्तींसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ते सलमान खानच्या गर्व या चित्रपटातही दिसले होते. मात्र, त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर एक वेळ अशी आली की त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यानंतर अचानक हेमंत बॉलिवूड इंडस्ट्रीतून गायब झाले.

बिरजे यांची आर्थिक परिस्थिती खराब

काही वर्षांपूर्वी हेमंत यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची बातमी आली होती. 2016 मध्ये हेमंत यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याच्याकडे राहण्यासाठी घरही नाही अशा बातम्या आल्या होत्या. बातमीनुसार, ते राहत असलेल्या घराच्या मालकाने त्यांना बेघर केले होते. खरेतर, हेमंत यांचा घरमालकाशी करार संपला होता आणि त्यांनी हेमंत यांना अनेकदा घर रिकामे करण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...