आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपविरूद्ध थोपटले दंड:फडणवीस नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, किरीट सोमय्यांची करतात वकिली, इडीच्या कारवाईमुळे संतापलेल्या संजय राऊतांचा शाब्दीक वार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत घोटाळा केला पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांची वकीली करीत आहेत. हा प्रश्न पैशांचा नसून राष्ट्रभावनेचा आहे. महाविकास आघाडी सरकारविरुद्ध केंद्र सरकार सुडबुद्धीने कारवाया करीत आहे. आता देशात स्वातंत्र्याचा नवीन लढा सुूरू झाला असून स्वातंत्र्याच्या नवीन लढ्यात बलिदानासाठी आम्ही तयार आहोत अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपविरूद्ध दंड थोपटले.

राऊत म्हणाले, माझा मुद्दा पंतप्रधान मोदींकडे मांडला यामुळे मी शरद पवारांचा आभारी आहे. देशाच्या शरद पवारांची भूमिका राष्ट्राच्या हितासाठी महत्वाची आहे.सोमय्यांनी आयएनएस विक्रांतचा घोटाळा केला. इतर घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा वाटतो. इमोशनल ब्लॅकमेल करून सोमय्यांनी आएनएस विक्रांत घोटाळा केला. मी या प्रकरणात पुराव्यासह बोलत आहे.

फडणवीस सोमय्यांची वकिली करतात

महाराष्ट्रातील नेते सोमय्यांची वकीली करीत आहेत. देवेंद्र फडणवीस नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. ते सोमय्यांची वकिली करीत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई होत आहे.

देशात स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला

​​​​​​​आम्ही हिमतीने बोलतो आणि अनेक कारवायांना सामोरेही जात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. स्वातंत्र्याच्या नवीन लढ्यात बलिदानासाठी आम्ही तयार आहोत. देशात स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे. भाजपने कितीही खोट्या पेरण्या केल्या तरीही पिक येणार नाही.

नेमके काय म्हणाले संजय राऊत

''सकाळीच मी देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य ऐकले. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैशांचा अपहार करणाऱ्या किरीट सोमय्यांची ते ज्या प्रकरे वकिली करत होते याचे मला आश्चर्य वाटले. स्वत:ला प्रखर राष्ट्रवादी म्हणवणारे, हिंदुत्वावादी म्हणवणारे नेते आयएनएस विक्रांतच्या संदर्भातील घोटाळा जो बोफोर्स, राफेल या घोटाळ्यांपेक्षाही मोठा आहे, मला वाटते की, प्रश्न पैशाचा नसून राष्ट्र भावनेचा आहे.

हिंदूत्वाचा नकली गजर करणाऱ्यांचे खरे रूप आले बाहेर

भाजपचे राज्यातील विरोधी पक्षनेते या घोटाळ्याचं समर्थन करत होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. हिंदूत्वाचा नकली गजर करणाऱ्यांचे खरे रूप यातून बाहेर आले. अनेक सैनिकांचे बलिदान या विक्रांतने पाहिले. पाकिस्तानची फाळणी त्या विक्रांतने घडवली. या आयएनएस विक्रांतचा भ्रष्टाचार पुरावे असतानाही पुरावे कुठे आहे असे म्हणणाऱ्यांचे समर्थन राज्याचे विरोधी पक्षनेते बाजू घेतात? अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...