आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:भाषणे देऊन मोदी देशाला का गोंधळात टाकतात ? वंचित आघाडीचे नेते अॅड. आंबेडकर यांचा सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपलाही घेरले आहे

कुठलेही कटू वास्तव पंतप्रधान मोदी स्वत: सांगत नाहीत. ते सगळं अर्थमंत्र्यांवर किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर ढकलून देतात. त्यांना काही ठोस आणि स्पष्ट सांगायचं नसतं तर ते टीव्हीवर लाइव्ह भाषणे का देतात आणि संपूर्ण देशाला गोंधळात का टाकतात?’ असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. हे आर्थिक पॅकेज नेमके कसे असेल? त्याचे वाटप कसे केले जाईल? याची माहिती अर्थमंत्री देतील, असे त्यांनी सांगितले. त्यावरून आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान स्वत: वाईटपणा घेताना दिसत नाहीत. कुठलाही कटू निर्णय स्वत: सांगत नाहीत. ते सगळे ते इतरांवर सोडून देतात, असा टोला आंबेडकरांनी लगावला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपलाही घेरले आहे. ‘२० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देणारे पीएम केअर फंडासाठी एवढी जाहिरात का करत आहेत?’ असा सवाल मनसेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...