आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरे माणसापेक्षा 300 पट जास्त तेज:हवाई निगराणी सीमापार शहरांपर्यंत पोहोचली, संशयित हालचाली ओळखता येत आहेत, याचे कॅमेरे माणसापेक्षा 300 पट जास्त तेज

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनने रशियासोबतच्या युद्धात ड्रोनच्या माध्यमातून शत्रूच्या भूभागावर निगराणी करत पुन्हा एकदा हे तंत्रज्ञान चर्चेत आणले आहे. युक्रेनने अवकाशातील हेरगिरीद्वारे रशियाच्या अनेक ठिकाणांची ओळख पटवली आणि ते उद्‌ध्वस्तही केले. एअर सर्व्हिलान्सचे हे तंत्रज्ञान आता सीमापार शहरी सीमेपर्यंत पोहोचले आहे. आकाशाच्या नजरेतून प्रत्येक हालचाली रेकॉर्ड केल्या जातात आणि यानंतर गरज भासल्यास या फुटेजचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाला वाइड एरिया मोशन इमॅजनरी(वामी) म्हटले जाते. तसे पाहता २००६ पासून याचा वापर होत अाहे. मात्र रेकॉर्डिंग टूल्स आणि छायाचित्रांचे विश्लेषण करणाऱ्या साधनांतील सुधारणांमुळे ते असामान्य ठरले आहे. वामीचा सर्वांत आधी वापर अमेरिकेने इराकमध्ये केला होता. याद्वारे रस्त्याच्या कडेला ठेवलेले बॉम्ब ट्रॅक केले जात होते.

स्फोट झाल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवली. मात्र, याच्याशी संबंधित समस्याही आहेत. स्फोट ओळखला जातो, मात्र तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे अन्य हालचाली ट्रॅक करणे सोपे नाही. मात्र, आता व्हिडिओ गेम उद्योगात वापरली जाणारी चिप यात फायदेशीर ठरत आहे. एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने पिक्सल आणि फ्रेमद्वारे हजारो-लाखो फुटेजमध्ये असे फुटेज ओळखले जातात, ज्यात संशयित हालचाली असतात. दरम्यान, वामीचे तंत्रज्ञानही चांगले झाले आहे. अमेरिकी फर्म एल ३ हॅरिस ऑटोमॅटिक निगराणीसाठी वामी सेन्सर बनवते. त्यातील मोशन-अॅनालायझिंग सॉफ्टवेअर चेक पॉइंटपासून वाचणाऱ्या किंवा ताफ्यात चालणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवते. विडार (व्हिज्युअल डिटेक्शन अँड रेंजिंग) शोध आणि बचाव मोहिमेत लाइफ जॅकेट ओळखू शकते. त्यातील कॅमेरा माणसाच्या तुलनेत ३०० पट वेगवान आहे आणि तो ६ मीटर उंच लाटांतही लाइफ जॅकेट ओळखू शकतो. जास्त किमतीमुळे वामी आतापर्यंत लष्करी वापरापुरतेच मर्यादित होते. आता पोलिस, अग्निशमन यंत्रणाही ते वापरतात.

टेहळणीत अमेरिका पुढे, तर चीनला क्लोज-सर्किट टेलिव्हिजन पसंत
अवकाशातून लक्ष ठेवण्याच्या तंत्रज्ञानात अनेक देश पुढे आहेत, पण आश्चर्याची बाब म्हणजे चीन त्यात सामील नाही. तो आपल्या देशात असे प्रकार करण्यासाठी प्रकारांसाठी क्लोज-सर्किट टेलिव्हिजनला प्राधान्य देतो. तथापि, ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल आणि तुर्कीसारखे देश वामी किट तयार करतात. अमेरिका त्यात सर्वात पुढे आहे.

बातम्या आणखी आहेत...