आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा वालकर खून प्रकरण:आफताबने तुरुंगात मागितली पुस्तके ; तिहार प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने तिहार तुरुंग प्रशासनाकडे एक मागणी केली आहे. ज्यावर तिहार प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे समोर आले आहे. आफताबाने तुरुंगात वाचनासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्याची मागणी प्रशासनास केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिली आहे. अफताब याने श्रद्धाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. नंतर ते जंगलात फेकून दिले. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...