आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • After 100 Days, Barber Shops And Salons Opened Today, A Sero Survey Will Be Conducted In Mumbai To Overcome Corona, 42% Active Patients In The State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:सलग तिसऱ्या दिवशी आढळले 5000 पेक्षा जास्त रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1.69 लाख पार; राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाउन वाढवला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या मालाड भागातील एका घरात तपासणी करण्यासाठी दाखल झालेले आरोग्य कर्मचारी, मालाड परिसर मुंबईचा नवा नवीन केंद्र बनला आहे - Divya Marathi
मुंबईच्या मालाड भागातील एका घरात तपासणी करण्यासाठी दाखल झालेले आरोग्य कर्मचारी, मालाड परिसर मुंबईचा नवा नवीन केंद्र बनला आहे
  • याआधी रविवारी 5400 आणि शनिवारी 5300 पेक्षा जास्त रुग्ण आढळले होते

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सोमवारी 5257 नवी कोरोना रुग्ण आढळले, तर 181 जणांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील रुग्णसंख्या 1,69,883 वर पोहचली आहे. याआधी रविवारी 5400 आणि शनिवारी 5300 पेक्षा जास्त रुग्ण मिळाले होते. 

महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आला लॉकडाउन

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.  राज्याच्या मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडून लॉकडाउन वाढवण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, राज्यात कोरोनाची परिस्थिती वाइट असून तो त्याचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे, कोरोना संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आहे. महामारी अॅक्ट 1897 च्या कलम-2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत महाराष्ट्रात 31 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाउन वाढवले जात आहे. या दरम्यान 'मिशन बिगीन अगेन'चे नियम लागू राहणार आहेत.

'मिशन बिगेन अगेन'चे नियम लागू राहतील

मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारच्या सर्व विभागांना यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये सुद्धा दूध, भाज्या आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वेळेत उघडली जातील. तसेच ऑड-इव्हन डे नुसार इतर दुकाने देखील उघडली जाऊ शकतात. यासोबतच ऑफिसमध्ये मर्यादित कर्मचारी उपस्थिती राहतील. 

राज्यात रविवारी सापडले विक्रमी 5,493 नवे रुग्ण 

महाराष्ट्रात रविवारी 5,493 संक्रमित सापडले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी शनिवारी राज्यात 5,300 पेक्षा जास्त रुग्ण सापडले होते. सध्या राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,64,624 झाली आहे. तर, रविवारी 156 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण मृतांचा आकडा 7,429 झाला आहे. सध्या राज्यात 70,607 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 86,575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आजपासून राज्यात न्हाव्यांची दुकाने सुरू

100 दिवसानंतर महाराष्ट्रात आजपासून न्हाव्यांची दुकाने, हेअर स्पा आणि सलून पार्लर सुरू झाले आहेत. राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचनांसह ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. पूर्वनिर्धारित अपॉइंटमेंटच्या आधारावर दुकाने चालविण्यास परवानगी दिली जाईल. सलून आणि न्हाव्यांच्या दुकानात केस कापणे, केस रंगविणे, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. दुकानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना या सेवा देताना हँडग्लोस, अ‍ॅप्रॉन आणि मास्क घालणे अनिवार्य आहे. प्रत्येक सेवेनंतर खुर्च्या स्वच्छ करणे बंधनकारक असेल. दुकानदारांना ग्राहकासाठी टॉवेल किंवा रुमालाची व्यवस्था करावी लागेल. तसेच दर दोन तासांनी दुकानाची फर्शी स्वच्छ करावी लागेल. 

बीएमसी मुंबईत केले जाणार सीरो सर्वेक्षण 

मुंबईत, पालिका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सीरो-सर्वेक्षण करणार आहे. 10,000 रँडम ब्लड सँपल घेतले जातील. मुंबईच्या एम-वेस्ट, एफ उत्तर आणि आर उत्तर प्रभागातील एनआयटीआय आरोग्य आणि टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे सर्वेक्षण केले जाईल. या अभ्यासानुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण, त्याचा प्रसार आणि त्याचे लोकसंख्येवर होणारे परिणाम याची माहिती दिली जाईल. या आधारावर कोरोना संबंधीत सार्वजनिक आरोग्य धोरण तयार करण्यात मदत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...