आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईकरांना दिलासा:मुंबईत आजपासून मेट्रो रुळावर, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा सुरु; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी सकाळी सात वाजता पहिली मोनोरेल चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावली. या वेळी कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली.
  • सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता प्रत्येक फेरीत 300 जण प्रवास करू शकतात

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. तर, मोनोरेल रविवारी पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई मेट्रो सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या वेळातच धावेल. भविष्यात गरज भासल्यास या वेळेत वाढ केली जाईल, असे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांना नव्या सवयींचे पालन करावे लागेल. यापूर्वी मेट्रो एका स्थानकावर १५ ते २० सेकंद थांबत असे. परंतु, आता ट्रेनमधील हवा सतत खेळती ठेवण्यासाठी मेट्रो एका स्थानकावर ३० ते ६० सेकंदांपर्यंत थांबेल. प्रत्येक मेट्रो स्थानकावर आत आणि बाहेर जाण्यासाठी प्रत्येकी एकच मार्ग खुला राहील. उद्यापासून दररोज मेट्रोच्या २०० फेऱ्या होतील. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता प्रत्येक फेरीत ३०० जण प्रवास करू शकतात.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक दोन तासानंतर मेट्रोच्या स्थानकांवरील सर्व टचपॉईंटस सॅनिटाईझ केले जातील. तर मेट्रोच्या प्रत्येक फेरीनंतर ट्रेनही सॅनिटाईझ होईल. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल.