आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांना धमकी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनौट प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन कॉल आला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

गृहमंत्री देशमुख यांच्या नागपूर येथील कार्यालयात हा धमकीचा फोन आल्याची माहिती एका मंत्र्यांनी विधान भवन परिसरात दिली. दरम्यान, मुख्यमंत्री व शरद पवार यांना आलेले धमकी म्हणजे गंभीर प्रकार असून समाजकंटक पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्नात आहेत. गृह विभागातर्फे या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, धमकीच्या फोनबाबत नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दुबईहून अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा साथीदार असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर मातोश्री बंगल्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...