आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांनी मानले आभार:प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर शरद पवारांनी मानले मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे, लतादीदी आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवारांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांच्या पित्ताशयात दोष निर्माण झाले असल्याचे निदान झाले आहे. शरद पवारांवर 31 मार्चला एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच राज्यभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. यानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत. 'माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.' असे ट्विट पवारांनी केले आहे.

या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना
शरद पवारांच्या प्रकृतीची बातमी कळताच राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यासोबतच या महाराष्ट्रातील जनतेच्या प्रातिनिधिक भावना असून उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. असे म्हणत पवारांनी आभार व्यक्त केले.

राज ठाकरेंचेही मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरेंचेही आभार मानले. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!' असे पवार म्हणाले. यासोबतच शरद पवारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर आभार व्यक्त केले आहेत.

शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. पुढील सूचना होईपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...