आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे टेन्शन वाढले:मुंबईपाठोपाठ मालेगाव, भिवंडीत गोवरचे हाॅटस्पाॅट; ज्येष्ठांना आजाराचा धोका

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत गोवरचे रुग्ण वाढत आहेत. लहान मुलांसह प्रौढ व्यक्तींना गोवरची लागण झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आता मालेगाव, पनवेल, भिवंडी आणि गोवंडीदेखील गोवरचे हॉटस्पॉट झाले आहेत. ज्येष्ठांनाही हा आजार होण्याचा धोका आहे. तथापि, येत्या काही दिवसांत व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली. पालकांनी मुलांचे लसीकरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत ३२०८ संशयित { ३२०८ संशयित गोवर रुग्ण मुंबईत { २०८ रुग्णांचे निश्चित निदान झाले. { ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. { मालेगाव, भिवंडी, गोवंडी, पनवेल ही शहरे बनली आहेत हाॅटस्पाॅट. { ७० वर्षांवरील ज्येष्ठांना गोवरचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. { ०२ ज्येष्ठांना मुंबईत गोवरने गाठले. { ०९ महिने ते ५ वर्षे वयाच्या बालकांना लस देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...