आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाविकास आघाडी:पवारांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारची नरमाईची भूमिका, मुंबईत 2 किमी परिघातच प्रवासाची अट रद्द

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कारोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान मुंबईत कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र यावर नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निर्णयावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कान टोचले असल्याचे वृत्त होते. मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारने ही अट मागे घेतली आहे. यानंतर नागरिकांना घराजवळच खरेदीकरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबद्दल पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने यास अद्याप अधिकृत दुजोरा नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यात अनेक ठिकाणी अचानक लावलेली टाळेबंदी, समन्वय समितीच्य बैठका न घेणे आणि 2 किमी अंतरात वावरण्याच्या तुघलकी निर्णयावर पवार यांनी ठाकरे यांचे कान टोचल्याचेही वृत्त होते.

मुंबई महानगर क्षेत्रातल्या 5 महापालिकांमध्ये शुक्रवारपासून अचानक टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याची माहिती सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आलेली नव्हती. या निर्णयासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावर पवार-ठाकरे बैठकीत चर्चा झाल्याचेही वृत्त होते. मुंबईत दोन किमी क्षेत्रात नागरिकांनी वावर ठेवावा, असे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्तांनी काढले होते. विशेष म्हणजे याची माहिती खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनाच नव्हती. त्यानंतर अनलाॅक 2.0 च्या नियमात 2 किमी शब्द वगळून आसपासच्या परिसरात वावर ठेवावा, याचा अंतर्भाव करण्यात आला. 

आता पोलिस आयुक्तांनी दोन किलोमीटर परिघाचा परिघातच प्रवास मुभा हा नियम रद्द केला आहे. त्याऐवजी घराजवळच खरेदी करा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहेत. त्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. यामुळे मुंबईत येणाऱ्यांची संख्याही वाढली होती. त्यामुळे रविवार आणि सोमवारी पोलिसांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहनांची धरपकड केली.

0