आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीम आणि व्यायाम शाळा:राज ठाकरे आणि फडणवीसांनंतर सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी, म्हणाल्या - जीम पुन्हा सुरू करणे आवश्यक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला एका जीम चालकाचे पत्र ट्विट करत पाठवले आहे.

राज्यभरात कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. दरम्यान सुरुवातीला लॉकडाउनची घोषणा होण्याच्यापूर्वीपासूनच राज्यातील जीम, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. अजूनही जीम बंदच आहे. राज ठाकरेंसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी जीम सुरू करण्याची मागणी केली आहे. त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जीम पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला एका जीम चालकाचे पत्र ट्विट करत पाठवले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे' असं म्हणत सुप्रिया सुळेंनी जीम पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्स यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. यानंतर राज ठाकरेंनी 'जिम सुरू तर करा, बघू काय होतं' असा सल्ला दिला होता. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर आता सुप्रिया सुळेंनीही जीम सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...