आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • After Raj Thackeray Raised Loudspeakers On Mosques Issue Abu Azmi Says Dj In Navratri And Ganpati Also Creates Noise Pollution | Marathi News 

अबू आझमींचा सवाल:राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांच्या वक्तव्यावर म्हणाले- गणपती, नवरात्री, विवाह समारंभातील डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टयांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी केली आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयाला भाजपच्या नेत्यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यावर राज्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू सणांवेळी वाजवण्यात येणाऱ्या डीजेमुळेही ध्वनिप्रदूषण होतो, असा मुद्दा आझमी यांनी उपस्थित केला आहे.

आझमी म्हणाले की, “मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?” असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे. पुढे आझमी म्हणाले की, “आम्ही कधी याबाबत कोणतीही तक्रार केली नसून, केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असे आझमी म्हणाले.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात मशिदींपुढे हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. यावर देखील आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको,” असे देखील आझमी यांनी स्पष्ट केले आहे.

"शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्रात येते. त्यामुळे त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. याची देखील पोलिसांनी तपासणी करावी." असे आझमी म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत आहेत. ते म्हणाले की, "माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सना धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. "ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?" असे राज ठाकरे म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...