आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपालांचा सल्ला:राज ठाकरेंनी वाढीव वीज बील आणि दूध दराचे प्रश्न मांडल्यानंतर राज्यपाल म्हणाले - पवार साहेबांशी बोलून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?' असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्दा राज्यपालांसमोर मांडला. यावेळी राज ठाकरेंना राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचा त्यांनी सांगितले आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'वाढीव वीजबिलासंदर्भात पहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे. राज्यपालांसोबत वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. यानंतर राज्यपाल म्हणाले की, पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना मनसे प्रमुख म्हणाले की, 'जिथे 2 हजार बिले यायची तिथे लोकांना 10 हजार बिल आता येत आहेत. त्यासाठी पहिले निवेदन राज्यपालांना देण्यात आले. कोणतीही गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असे सांगितले जाते मात्र त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिले बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल अशी आशाही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

सरकार का कुंथत आहे?
राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, 'मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कसलीही कमतरता नाही. मात्र आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?' असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.