आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजब विनंती:परप्रांतीय व्यक्तीने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी सोनू सूदकडे मागितली मदत, सोनूने दिला असा मजेशीर रिप्लाय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू दररोज सुमारे एक हजार परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात घेऊन जात आहे

मुंबईहून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या प्रयत्नांमुळे अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. तो दररोज सुमारे एक हजार परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात घेऊन जात आहेत. कोणाला आपल्या घरीग जायचे असल्यास त्यांनी आम्हाला माहिती द्यावी असे आवाहन सोनूने केले आहे. सोनू स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर लक्ष ठेवून आहे. आपल्या ट्विटरवर तो लोकांकडून त्यांची माहिती घेत त्यांना घरी पोहचवतो आहे. एका व्यक्तीने चक्क आपल्या गर्लफ्रेन्डला भेटण्याची इच्छा सोनूला बोलून दाखवली. यावर सोनूने त्याला मजेशीर रिप्लाय दिला आहे. 

सोनूने दिला असा रिप्लाय

सोनूच्या आवाहनानुसार, अनेक जण आपल्या घरी जाण्यासाठी सोनूच्या ट्विटरवर आपली माहिती देत आहे. अशात विश्वजीत द्विवेदी या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेन्डला भेटण्याची इच्छा सोनूला बोलून दाखवली. त्याने ट्वीट केले की, "भैय्या, एकदा गर्लफ्रेन्डशी भेटवा, बिहारलाच जायचे आहे." यावर सोनूने देखील त्याला मजेशीर प्रतिसाद दिला. सोनू म्हणाला की, "भाऊ थोडे दिवस दूर राहून बघ, खऱ्या प्रेमाची परीक्षा देखील होईल."

गरिबांची मदत करणे यालाच यश समज..

सोनू पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील आहे. तो व्यवसायाने अभियंता आहे. आई सरोज प्रोफेसर होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गरीब मुलांना शिकवायच्या. वडील शक्तीसागर यांचे कपड्यांचे एक मोठे शोरूम होते, जे आज सोनू कर्मचा-यांच्या मदतीने चालवतो. तो म्हणतो की, आमच्या घरात इतरांना मदत करण्याची एवढी आवड होती की माझे आईवडील म्हणायचे, गरिबांना मदत करणे म्हणजे यशस्वी होणे होय.

बातम्या आणखी आहेत...