आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • After The Chief Minister's Meeting, Ambadas Criticized Danven And Said That Those Who Betrayed The Voices Of Delhiites Should Not Teach Shiv Sena Hinduism.

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर अंबादास दानवेंची टीका:म्हणाले- दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचा आणि ती फोडण्याचे पाप दिल्लीकरांच्या नादाला लागून शिंदे गटाने केले. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असून आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मुख्यमंत्र्यांची आज पैठणमध्ये सभा झाली. त्यांनी केलेल्या टीकेला दानवेंनी प्रत्युत्तर दिले.

शिंदेंकडून हिंदुत्वावर शिंतोडे

अंबादास दानवे म्हणाले, ''1993 ला दंगल झाली, तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली. बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याच पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल केले. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राच अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखखाट होवो ''

मुक्तीसंग्रामाचा मुख्यमंत्री इतिहास विसरले

अंबादास दानवे म्हणाले, ''मराठवाड्यात येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरले, विकासाबाबत एक शब्दही काढला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याच काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

भल्याभल्याची वाट लावली

अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेच्या मुखपत्राने भल्याभल्यांची वाट लावली. अग्रलेखाची दखल घेतली जाते. मुखपत्रामुळे भल्याभल्यांची वाट लागली. त्यामुळे शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना संभाळून बोलण्याचा इशारा दानवे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...