आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्ड-सिल्वर विकली अपडेट:गेल्या महिन्यात किंमती घसरल्यानंतर पुन्हा महाग होत आहे सोने-चांदी, येणाऱ्या दिवसांमध्ये वाढतच राहू शकतात किंमती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जूनमध्ये सोने 2600 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले

गेल्या आठवड्याच्या घटानंतर या आठवड्यात सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या ज्वेलरी संस्थेच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात सोन्याचे दर 375 रुपयांनी वाढून 47,587 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. जे पहिले 47,212 रुपयांवर होते. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोने-चांदी महाग होऊ शकते.

चांदी 69 हजारांवर पोहोचली
त्याचबरोबर चांदीचा भावदेखील 558 रुपयांनी महाग झाला असून 68,975 रुपये झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हे 68,417 रुपये होते. या वर्षाच्या अखेरीस चांदीही प्रति किलो 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

जूनमध्ये सोने 2600 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, जून महिन्याबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात आतापर्यंत सोन्याचे भाव 2,669 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या महिन्याच्या सुरूवातीला म्हणजेच 1 जून रोजी सोने 49,422 रुपयांवर होते, जे आता खाली 46,753 रुपयांवर आले आहे. दुसरीकडे चांदीचा विचार केला तर 4,596 रुपयांनी स्वस्त होऊन 72,428 वरुन 67,832 रुपयांवर आली आहे.

वर्षाच्या अखेरीस सोने पुन्हा 55 हजारांपर्यंत जाऊ शकते
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता म्हणतात की लॉकडाऊनमुळे दागिन्यांची मागणी कमी झाली आहे, डॉलर मजबूत असल्यानेही सोन्यावर अजूनही दबाव आहे. म्हणूनच सोन अजूनही वर-खाली जात आहे.

अनुज गुप्ता म्हणतात की जुलैनंतर ऑगस्टपासून सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढेल. यासह, वर्षाच्या अखेरीस ते पुन्हा 55 हजारांपर्यंत जाऊ शकते. म्हणूनच या पडझडीबद्दल गुंतवणूकदारांना घाबरून जाण्याची गरज नाही.

वाढत आहे सोन्याची मागणी
चालू आर्थिक वर्षात (2021-222) एप्रिल ते मे या काळात देशातील सोन्याची आयात वाढून 6.91 अब्ज डॉलर (51 हजार कोटी) झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 च्या याच कालावधीत या सोन्याची आयात 7.91 कोटी डॉलर (599कोटी रुपये) होती. देशात वाढत्या मागणीमुळे सोन्याची आयात वाढू लागली आहे. एप्रिलमध्ये 6.3 अब्ज डॉलर जवळवास 46 कोटी रुपयांच्या सोन्याची आयात झाली आहे.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते
सोन्याचे शुद्धता कॅरेटवर अवलंबून असते. 24 कॅरेट सोन्याचे सर्वात शुद्ध सोन्याचे मानले जाते, परंतु त्याचे दागिने बनवत नाही कारण ते खूप मऊ आहे. साधारणपणे दागिण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरले जातात, ज्यात 91.66% सोने असते.

बातम्या आणखी आहेत...