आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझिरे आता मनसेतच:सोडचिठ्ठी दिल्याच्या अवघ्या 3 दिवसांत निर्णय बदलला; राज ठाकरेंनी दिली माथाडी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे नेते नीलेश माझिरे यांनी तीन दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, माझिरे यांनी पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मनसे नेते वंसत मोरे आणि माझिरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली असून, राज ठाकरेंनी माझिरे यांची समजूत काढली आहे.

वसंत मोरे हे नीलेश माझिरे यांना घेऊन आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे यांनी माझिरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माझिरे यांनी मनसेतच राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी नीलेश माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदावर नियुक्त केले. निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

सोशल मीडियावर पोस्ट

सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत नीलेश माझिरे यांना आपण मनसे सोडत असल्याची माहिती दिली होती. पुण्यातील कोअर कमिटीच्या हुकूमशाहीला कंटाळून आपण आज पक्ष सोडत आहे. पक्षासाठी दिवस-रात्र न पाहता काम करत राहिलो. अंगावर गुन्हे घेतले, त्याचे फळ काय भेटले? पदावरून पायउतार, माझे जिल्हाध्यक्ष पद थांबवले. याला पूर्णतः पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि बाबू वागसकर जबाबदार आहेत. असेच जर राहिले तर पक्ष तळाशी गेल्याशिवाय राहणार नाही. मी माझे मार्गदर्शक वसंत तात्या मोरे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारे महाराष्ट्र सैनिक यांची मनापासून माफी मागतो. भविष्यात तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर एवढच सांगतो हा नीलेश माझिरे तुमच्या मदतीसाठी पहिला तिथे असेल, अशी फेसबुक पोस्ट माझिरे यांनी केली होती.

माझिरे आणि वसंत मोरे हे सतत शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याने ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र, त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...