आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासन निर्णय:फडणवीस सरकारविरोधी आंदोलनाचे खटले मागे, राज्याच्या गृह विभागाचा निर्णय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होणार लाभ

फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या सामाजिक व राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. तसा शासन निर्णय बुधवारी काढण्यात आला. सत्तेत येताच फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील (वर्ष २००९-२०१४) राजकीय व सामाजिक आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी बहुतांश खटले भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांवर दाखल झालेले होते. तोच कित्ता आता आघाडी सरकारने गिरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१९ पूर्वीचे राजकीय व सामाजिक आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser