आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कृषी संकट:खरिपानंतर शेतीची परिस्थिती बिकट; नगदी पिके कमी करून अन्नधान्य घेण्याचा पी. साईनाथ यांचा सल्ला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय कापूस मोठ्या प्रमाणात चीन खरेदी करतो. संघर्ष चिघळल्याने यंदा कापूस निर्यात होणार नाही

साईनाथ यांनी महाराष्ट्र किसान सभेच्या लाइव्ह व्यासपीठावर रविवारी ‘कोरोना काळातील भारतीय शेती’ यासंदर्भात विचार मांडले त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘रब्बीच्या काळातील कापूस, साखर गोदामात शिल्लक आहे. कलिंगड, टाेमॅटो, द्राक्षे, तंबाखू या नगदी पिकांना दर मिळाला नाही. सरकारने विलंबाने मदत केली. खरीपात अशीच परस्थिती कायम असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पिके कमी करून वर्षभर कुटुंबाला लागणारे अन्नधान्य व डाळी घ्यावीत. म्हणजे त्यांचा किमान त्यावर उदरनिर्वाह तरी होईल.’ ‘केंद्र सरकारच्या गोदामात ८२० कोटी टन धान्य पडून आहे. तरी शिधापत्रिका नसणाऱ्यांना लाॅकडाऊन काळात मोफत धान्य देण्यास सरकारने टाळाटाळ केली.

नगदी पिके कमी करून अन्नधान्य घेण्याचा सल्ला

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय निर्यात ठप्प असून रब्बीचे शेती उत्पादन पडून आहे. त्यामुळे खरिप हंगामात उत्पादीत केलेल्या शेतमालास बाजारपेठ आणि योग्य दर मिळाणार नाही. परिणामी, शेतकरी अाणि ग्रामीण मजूर यांची स्थिती आणखी खालावेल, असा गंभीर इशारा शेतीतज्ञ आणि ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी दिला आहे.

भारतीय कापूस चीनकडून खरेदी

> भारतीय कापूस मोठ्या प्रमाणात चीन खरेदी करतो. संघर्ष चिघळल्याने यंदा कापूस निर्यात होणार नाही.

>  अमेरिका, इंग्लंडच्या संसदेची प्रत्यक्ष व व्हर्च्युअल अधिवेशने झाली. मात्र भारतीय संसदेचे झाले नाही.

>  कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधली गेल्याने भारतीय शेती संकटात सापडली आहे.

>  २० वर्षांत देशात ३ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

>  शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने ग्रामीण आलुते-बलुते यांचे व्यवसाय नष्ट झाले.

> लाॅकडाऊनकाळात पंतप्रधानांनी एकदाही कृषी संकट हा शब्द वापरला नाही.

0