आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांची काँग्रेसवर टीका:केवळ राजकारणासाठी कृषि विधेयकाला केला जातोय विरोध, जे काही आंदोलन केलं ती काँग्रेसची लबाडी - देवेंद्र फडणवीस

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष खालच्या स्तराला जाऊन काम करत आहेत.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने कृषि क्षेत्राशीसंबंधीत तीन विधेयक मांडली आहेत. यामधील दोन विधेयक दोन्हीही संभागृहात मंजूर झाली. एक विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून, राज्यसभेत पारित व्हायचं आहे. दरम्यान सोमवारी विधेयक मंजूर होत असताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसने या विधेयकाला कडाडून विरोध केला. यावरुन आता देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले की, कालचं राज्यसभेतलं वर्तन हे निंदनीय होतं. देशाच्या संसदेत असं वर्तन कधीच पाहायला मिळालायं नाही ते आता पाहायला. काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष खालच्या स्तराला जाऊन काम करत आहेत. कृषी विधेयकावरुन काँग्रेसने जे काही आंदोलन केलं ती काँग्रेसची लबाडी आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच काँग्रेस हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याचंही ते म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कृषि विधेयकाचे महत्त्व सांगितले. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. जी दोन विधेयकं पास करण्यात आली ती क्रांतीकारी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याच दोन विधेयकांचे आश्वासने देण्यात आली होती. मोदी सरकारने काँग्रेसने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. पण आता काँग्रेसच याला विरोध करत आहे. या विधेयकांना विरोध करणे म्हणजे बेगडीपणा आहे असंही फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...