आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्‍तार यांच्‍या विधानाचे विधानसभेत पडसाद:कृषिमंत्री अब्दुल सत्तार "हाय हाय''; मुख्यमंत्र्यांसोबत हस्तांदोलन‎

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी‎ विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या‎ नेतृत्त्वाखाली घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या "या कृषी मंत्र्यांचे करायचे काय, खाली‎ डोके वर पायं, "खोके सरकार हाय हाय'', "५०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच‎ पाहिजे'' ,''सट्टा लावतो म्हणणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो'', अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. या वेळी‎ तेथून जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मात्र विरोधकांनी हस्तांदोलन केले.‎

बातम्या आणखी आहेत...