आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात रक्तपेढ्यांमधून देण्यात येणाऱ्या रक्तातून एड्सचे संक्रमण होण्याचे प्रमाण चार पटींने वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
चेतन कोठारी यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे.
एचआयव्हीची लागण
राज्यात गेल्यावर्षी जुलैपर्यंत म्हणजे केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 272 लोकांना रक्तपेढ्यांमधून देण्यात आलेल्या रक्तातून एड्सचा संसर्ग झाला. एड्ससारखा दुर्धर आजार केवळ असुरक्षित लैंगिक संबंधांतूनच होतो हा भ्रम दूर झाला आहे.
राज्यात 2017 ते 2022 पर्यंत एकूण एक हजार 10 एचआयव्ही संसर्गाची नोंद झाली. सध्या राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये एन्झाईम लिंक इम्यून सोरबंट अॅसी टेस्टच्या माध्यमातून रक्ताची चाचणी केली जाते. परंतू, या चाचणीत अनेक त्रूटी असल्याचे तज्ञ सांगतात.
लैंगिक पूर्वायुष्याची माहिती आवश्यक
सरकारी रक्तपेढीत काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, रक्त संक्रमणाद्वारे एचआयव्हीचा प्रसार होणे हे भीषण वास्तव आहे. हे टाळण्यासाठी दोन गोष्टी आमलात आणता येतील. एक म्हणजे, रक्तपेढ्यांनी NAAT सारखी उत्तम चाचणीचा अवलंब करावा. दुसरे- दात्यांच्या पूर्वायुष्याचे योग्य विश्लेषण करणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक लैंगिक भागिदार, किंवा वेश्यागमन, स्थानिक दुकानांमधून शरिरावर टॅटू काढणे याची माहिती घेणे आवश्यक आहे.
रक्तपेढ्यांचा ढिसाळपणा
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ ईश्वर गिलाडा यांनी १९८९ मध्ये असोसिएशन लॅब्ज, भारत सिरम्स आणि मुंबई ठाण्यातील १५ रक्तपेढ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात सुरक्षित रक्ताबद्दल जनजागृती झाली. यातून शेकडो एड्स बाधित रक्तदाते सापडले. तब्बल ९ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने रक्तपेढीतील रक्त घेण्याआधी एड्सची चाचणी अनिवार्य केली. मात्र, ताज्या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा रक्तपेढ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.
काय सांगते आकडेवारी?
2021 मध्ये 68 आणि 2020 मध्ये 49 लोकांच्या तुलनेत 2022 मध्ये राज्यातील 272 लोकांना रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाली.
सहा महिन्यात तब्बल २७२ जणांना रक्तातून एड्सची बाधा झाली. |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.