आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअर इंडिया:विमानात मधली सीट रिकामी ठेवण्याची विनंती फेटाळली, एअर इंडियाच्या वैमानिकांची हायकोर्टात याचिका

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधली सीट रिकामी ठेवण्याचा आदेश देण्याची एअर इंडियाच्या वैमानिकाने केली होती विनंती

कोरोनाबाधित व्यक्तीचा स्पर्श झाला म्हणून कोणाला संसर्ग होत नाही. मधल्या सीटवरील प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन दिल्यास धोका टळेल, या तज्ज्ञ समितीच्या मताविषयी संशय घेण्यास जागा नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी तडजोड केली जात आहे असेही म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून मधली सीट रिकामी ठेवण्याचा आदेश देण्याची एअर इंडियाच्या वैमानिकाने केलेली विनंती उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. विमानात तीन आसनांपैकी मधले आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश असतानाही परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्याच्या ‘वंदे भारत मिशन’मध्ये एअर इंडियाकडून उल्लंघन झाले, असा आक्षेप वैमानिक देवेन कयानी यांनी अॅड. अभिलाष पणिकर यांच्यामार्फत याचिका दाखल करून नोंदवला. त्यावर आज सुनावणी झाली. ‘कोरोनाबाधित व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून कोणाला कोरोनाचा संसर्ग होत नाही. मधल्या सीटवरील प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन दिल्यास धोका टळेल, या तज्ज्ञ समितीच्या मताविषयी संशय घेण्यास जागा नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी तडजोड केली जात असल्याचेही म्हणता येणार नाही,’ असे निरीक्षण नोंदवून मधली सीट रिकामी ठेवण्याचा आदेश देण्याची एअर इंडियाच्या वैमानिकाने केलेली विनंती उच्च न्यायालयाने आज फेटाळली. ३१ मेच्या परिपत्रकाद्वारे दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, असे निर्देशही या वेळी न्यायालयाने विमान कंपन्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...