आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 ऑगस्ट रोजी होणार कुंद्राच्या याचिकेवर निर्णय:मुंबई सत्र न्यायलयाने राज कुंद्राच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली, आज संपतेय कुंद्राची न्यायालयीन कोठडी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली.

पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालय याप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी आपला निर्णय देणार आहे. 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक करण्यात आली. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थोर्पे याच्या जामीन अर्जावरही 20 ऑगस्ट रोजी निर्णय दिला जाणार आहे.

जामीन अर्जावर न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून उत्तरही मागितले होते. मुंबई पोलिसांनी कुंद्राच्या चौकशीचा तपशील आज न्यायालयात सादर केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे वकील कुंद्राच्या जामिनाला विरोध करतील. ते कुंद्राविरोधात अभिनेत्री शर्लिन चोप्राने पोलिसांना दिलेल्या जबाबाचा आधार घेऊ शकतात.

यापूर्वी एकदा जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे

यापूर्वी 28 जुलै रोजी किल्ला न्यायालयाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली होती. फिर्यादी पक्षाच्या या युक्तिवादावर न्यायालय समाधानी होते की, त्याच्या सुटकेनंतर राज कुंद्रा या प्रकरणात तपास आणि साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो. पोलिसांनी न्यायालयाला असेही सांगितले की, त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे आहेत आणि गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कार्यालयातून 68 अॅडल्ट व्हिडिओ जप्त केले आहेत.

या कलमांखाली राज कुंद्रावर खटला चालवला गेला

  • भादंवी कलम 292, 296 - अश्लील सामग्री बनविणे आणि विक्री करणे
  • कलम 420 - विश्वासघात, फसवणूक
  • माहिती तंत्रज्ञान कायदा कलम, 67, 67 (A) - इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री टाकणे आणि ती प्रसारित करणे
  • कलम 2 (जी) 3, 4, 6, 7 - महिलांशी संबंधित अश्लील चित्रपट बनविणे, विक्री करणे आणि त्याचा प्रसार करणे.

अश्लीलताविरोधी कायदा

इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीचा व्यापार या दिवसेंदिवस वेगाने वाढला आहे. यामुळेच पोर्नोग्राफी हा मोठा व्यवसाय झाला आहे. पोर्नोग्राफीमध्ये फोटो, व्हिडिओ, मजकूर, ऑडिओ यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. अशाप्रकारचा कंटेंट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे, इतरांना पाठवणे किंवा इतरांमार्फत ते प्रकाशित करणे यासाठी अँटी-पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

अश्लील व्हिडिओ बनवणे बेकायदेशीर
इतरांचे अश्लील व्हिडिओ बनवणे, एमएमएस बनवणे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इतरांना ते उपलब्ध करुन देणे हे अश्लीलताविरोधी कायद्याच्या कार्यक्षेत्रात येते. तसेच, हा कायदा बेकायदेशीर किंवा संमतीशिवाय कोणालाही अश्लील सामग्री पाठवणाऱ्यांना लागू आहे. अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा पाठवणे बेकायदेशीर आहे. सोबतच ते पाहण्यावर, ऐकण्यावर आणि वाचण्यावर कोणतीही बंदी नाही. परंतु, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे बेकायदेशीर आहे.

बातम्या आणखी आहेत...