आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्स प्रकरणात मंगळवारी अटक झालेला अभिनेता एजाज खानला 8 तासांच्या चौकशीनंतर बुधवारी मुंबईतील NDPS कोर्टात सादर करण्यात आले. न्यायालयात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने एजाज खानबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
NCB ने सांगितल्याप्रमाणे, मागच्या आठवड्यात अटक करण्यात आलेला शादाब बटाटा आणि एजाज खानदरम्यान संबंध असल्याचे समोर आले आहे. NCB ला आता दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची आहे, त्यामुळे एनआयएने एजाजच्या 3 दिवसांच्या कस्टडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मंजुर केली आहे.
शादाबकडून ड्रग्स घेऊन बॉलिवूड सेलिब्रिटीजला द्यायचा एजाज
मंगळवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने एजाज खानला मुंबई एअरपोर्टवरुन ताब्यात घेतले होते. NCB च्या तपासात समोर आले आहे की, शादाब तोच व्यक्ती आहे, जो एजाजला ड्रग्स पुरवायचा आणि एजाज हे ड्रग्स बॉलिवूडशी संबंधित लोकांना द्यायचा. याप्रकरणी लवकरच अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
एजाजचे अनेक क्लाइंट TV इंडस्ट्रीशी संबंधित
NCB च्या एक अधिकाऱ्याने सांगितले की, एजाजचे अनेक क्लाइंट TV इंडस्ट्रीशी संबंधित होते. त्यांच्यापर्यंत ड्रग्स पोहचवण्यासाठी एजाज व्हॉइस नोटचा वापर करायचा. ऑर्डर मिळताच रेकॉर्डिंग डिलीट करायचा. ड्रग्सबाबत बोलताना हा सीरियल आणि चित्रपटांच्या नावावरुन बनलेल्या कोडमधून बोलायचा.
लॉकडाउनच्या नावावर जास्त ड्रग्स खेरेदी करण्यास सांगितले
NCB ने न्यायालयात सांगितले की, त्यांच्याकडे एजाज खान आणि शादाब बटाटादरम्यान झालेल्या बोलण्याचा सीडीआर, व्हॉट्सअॅप चॅट आणि व्हॉइस रेकॉर्ड आहेत. यात एजाज ड्रग्सची ऑर्डर देणे आणि पैसे ट्रांसफर करण्याबाबत बोलत आहे. बटाटानेदेखील NCB च्या चौकशीत एजाजला ड्रग्स पुरवल्याचे कबुल केले आहे. एजाजच्या चॅटमधून खुलासा झाला आहे की, त्याने लॉकडाउनच्या नावावर ग्राहकांना जास्त ड्रग्स घेण्यास सांगितले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.