आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय:शेतकरी हीच आमची जात; अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहो शेतकरी हीच आमची जात आहे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला आहे.

नेमके प्रकरण काय?

सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्‍या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केली. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले.

कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये

दरम्यान या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

सरकार वर्णभेदासाठी आग्रही - जयंत पाटील

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा निषेध माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. सांगली येथील खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित करुन शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या या भूमिकेतून दिसत आहे. सरकारने ही भूमिका रद्द केली पाहिजे. ही बाब जातीभेद वाढवणारी ठरू शकते, अशी भीतीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली

बातम्या आणखी आहेत...