आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित पवार यांनी आपल्या भाषणात 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' म्हणण्याऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख केला होता. दरम्यान अजित पवार यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी-भाजप आपापसात भिडल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पुण्यात आयोदजित एका कार्यक्रमात भाषणावेळी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांचे स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.
हिंदूंच्या भावना दुखावल्या
या प्रकरणात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तुषार भोसले म्हणाले, वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या. आता क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, असा सवाल उपस्थित केला होता.
तु वारकरी तरी आहेस का?
आता आमदार अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मिटकरी म्हणाले, शाडीग्राम नावाच्या माकडाने दिवसा गांजा ओढायला सुरुवात केली आहे. हा कोणत्या पंथाचा आहे हे लवकरच सांगणार आहोत. कुठलाही धंदा नसल्याने हा नेहमीच अजित पवार यांच्यावर बोलत असतो.
अमोल मिटकरी म्हणाले, अजित दादांकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीमुळे या झाकणझुल्याचा का एवढा तिळपापड झाला. एका मठातून तुला लाथा घालून कसे हाकलून दिले आहे त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. तु वारकरी तरी आहेस का? तुला कोणी भिक घालत नाही. या शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी तुषार भोसलेंवर टीका केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.