आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकरी आत्महत्या:अजित पवारांनी घेरले; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही नाफेडची खरेदी सुरू नसल्याचा आरोप

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पाऊस, देशोधडीला लागलेला शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून जाहीर न झालेली नाफेडची खरेदी यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला घेरले. कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकरी आत्महत्या सुरू असून, पण सरकार अजून हा प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याचा आरोप केला.

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी नियम 57 ची नोटीस देत अवकाळी पाऊस आणि शेतकरी आत्महत्येचा विषय विधानसभेत चर्चेत घेण्याची मागणी केली. मात्र, प्रश्नोत्ताराचा तास असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली. त्यामुळे विरोध आक्रमक झाले.

पटोले, थोरात आक्रमक

विधिमंडळ अधिवेशनात आज अर्थमंत्री देवेंद्र फडणीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र, सकाळपासूनच विरोधकांनी शेतकरी आत्महत्या आणि अवकाळी पावसाच्या मुद्यावरून विधानसभेत रान उठवले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. हा विषय गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी केली. दिव्य मराठीने राज्यातल्या शेतकरी आत्महत्येचा प्रश्न बातमीतून मांडला होता. त्याचेच आज विधिमंडळात पडसाद उमटले.

परिस्थिती खूपच गंभीर

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालते. लाखांचा पोशिंदा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे कुठल्याच भागात घडू नये. परंतु दुर्दैवाने ते घडते आहे. आम्हाला असे वाटले होते की, मुख्यमंत्री उपमुख्यंत्री मदत घोषित करायला हवी होती, अशी मागणी त्यांनी केली.

दिलासाही दिला नाही

महिला दिनाच्या निमित्ताने काल दिवसभर विधानसभेत चर्चा झाली. मात्र, हे कामकाज संपल्यानंतर तरी सरकारने निवेदन करून तातडीने मदत जाहीर केले पाहिजे होती. तातडीचे पंचनामे जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे होता. मुख्यमंत्र्यांनी बळीराजा दिलासा द्यायला हवा होता. मात्र, कोणीही काहीही केले नाही, याची जाणीव अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

खरेदी सुरूच नाही

अजित पवार पुढे म्हणाले की, एक लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सगळ्या विभागाची आकडेवारी आलीय. मुख्यमंत्री महोदय कांद्याची खरेदी सुरू झाल्याचे सभागृहात सांगतात. मात्र, ती ती सुरू झालेली नाही. हरभऱ्याची खरेदी सुरू नाही. हस्तक्षेप करून ही खरेदी सुरू केली पाहिजे. तातडीने मदत झाली पाहिजे. केंद्राची टीम मागवली पाहिजे. राज्याचा महसूल विभागाने बांधावर गेले पाहिजे, याची जाणी त्यांनी करून दिली.

बातम्या आणखी आहेत...