आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारीवर सुळे कडाडल्या:'संघर्ष करणे पवारांची खासियत आहे... महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही' - सुप्रिया सुळे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांसोबतच नातेवाईकांच्या घरावर आणि त्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. गुरुवारी केलेल्या या कारवाईनंतर आजही झाडाझडती सुरूच आहे. मुंबईतील नरीमन पॉइंट इथं पार्थ पवारांच्या घरी आज अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली असल्याची माहिती आहे. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत असल्याचे सुप्रिया म्हणाल्या आहेत.

नवरात्रौत्सवासाठी देवीच्या दर्शनासाठी ठाण्यामध्ये सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, नवरात्र म्हणजे माझी आई आहे. महाविकास आघाडीने मंदिरे उघडली त्यांचे आभार. तसेच सरकारने जे नियम आखून दिलेला आहेत त्या नियमाचे पालन सर्वांनी करावे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांवरील कारवाईवर भाष्य केले.

महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही
सुप्रिया सुळे या आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य करत म्हणाल्या की, ' ते नुसते दादांचे नातेवाईक नाहीत. तर दे आमचे देखील नातेवाईक आहेत. आमचे एकत्र कुटुंब आहे आणि संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरीही महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकला नाही आणि झुकणार ही नाही. सुडाचे राजकारण आम्ही कधीही केले नाही आणि कधी करणार देखील नाही.' असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.