आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सुप्त राजकीय घडामोडी सुरू:अजित पवार - CM शिंदे - फडणवीस यांची भेट, सुमारे एक तास चर्चेत गुफ्तगू काय? चर्चांना ऊत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुप्त राजकीय घडामोडी सुरू असून कालच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत सुमारे सव्वातास चर्चा केली. त्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुमारे एक तास त्यांच्यात चर्चा झाली. यामुळे राजकारणात चर्चांना ऊत आला आहे.

नुकसान भरपाईचे कारण

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे - फडणवीस यांच्यात भेट झाल्याचे बोलले जात आहे. तरीही राजकीय वर्तुळात मात्र, या भेटीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सरकार शेतकऱ्यांत समन्वय हवा

पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याबाबत केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारमार्फत रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावे. पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेती वाचवण्यासाठी वन अधिकारी व टसर शेती उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधून सुरक्षितपणे हा व्यवसाय पुढे कसा सुरु राहील, याबाबतीत शासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, आज पवार सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेत आहेत.