आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारामतीमध्ये होणाऱ्या अॅग्रीकल्चर डेव्हलपेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहे. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याने या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या उपस्थित न राहण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि आमदार रोहित पवार हे शिर्डीतील शिबीरांमध्ये आले होते. मात्र तेव्हाही अजित पवार तिथे आले नव्हते. महिनाभरापूर्वी ते नाराज असल्याच्या बातम्यादेखील पुढे आल्या होत्या. मात्र यावेळी अजित पवारांनी प्रश्न विचारनाऱ्या पत्रकारांनाही झापले होते. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले होते. त्यावर आक्रमक भूमिका घेण्याऐवजी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत जयंत पाटील यांची चूक मान्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती.
अजित पवार नाराज असल्याची चर्चा
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये एक अधिवेशन झाले होते. शरद पवारांच्या भाषणावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. शरद पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी शिर्डीला येत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरापेक्षा अजित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवले.
कृषिकच्या उद्घाटनाला येणार रणवीर चंद्रा
माय्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आर्टिफिशयल इंटेलिजनस विभगाचे डॉ अजित जावकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता चंद्रा आणि जावकर हे बारामतीमधील विविध संस्थांना भेट देणार आहेत.
राज्यभरात अजित पवारांविरोधात आंदोलन
बारामतीमधील या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, यांच्यासह कृषी क्षेत्रांशी निगडित नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितलं होतं. परंतु आता अजित पवार हे या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.