आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषछ घेत राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री पाहून त्यांना कुणी मतदान केले नाही.आतापर्यंत देशाचे अनेक पंतप्रधान झाले त्यांना बहुमताचा आदर करून निवडून दिले आहे. हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर वाढती महागाई आणि बेरोजगारी हा देशासमोर महत्त्वाचा प्रश्न असून त्यावर बोलायला हवे. मंत्र्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करू नये. आपण देशाला मागे का नेत चाललोय.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 2014 ला स्वत:ची इमेज तयार केली. त्यांची डिग्री बघून त्यांना मतदान केले नाही. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत त्यांनी करिश्मा तयार केला. बहुमताचा आदर करायला महत्त्व आहे. तर राज्यात 145 बहुमत असेल तर मुख्यमंत्री होता. राजकारणात डिग्रीचे असे काही नाही संबंध येत नाही. महत्त्वाचा प्रश्न हा महागाई, बेरोजगारीचा आहे, त्यावर बोलायला हवे ते सगळे सोडून पंतप्रधानाच्या डिग्रीवर बोलणे महत्त्वाचे आहे असे मला वाटत नाही.
गैरहजेरी म्हणजे नाराजी नाही
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सभेत गैरहजेरी म्हणजे नाराजी असे अजिबात नाही, माध्यमांनी खुर्चीवर बोलू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले- प्रत्येक सभेला सगळेच उपस्थित असेल असे नाही. सभेत गैरहजेरी म्हणजे नाराजी असं अजिबात नाहीये. प्रत्येक सभेत 2-2 नेते बोलतील असे धोरण स्वीकारले आहे. राज्यभर मविआच्या सभा होणार आहेत. उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास असल्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची होती. प्रसारमाध्यमांनी कुणी कुठल्या रांगेत बसलं, याविषयी बातम्या देऊ नयेत.
गौरव यात्रा का नाही काढली?
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, गौरव यात्रा तुम्ही करता, तर कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्य का थांबवले नाही. अनेक महापुरुषांचे अपमान झाले तेव्हा का गौरव यात्रा काढली नाही? असा सवाल पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही सरकारमधील लोकांबद्दल अपशब्द बोलणे टाळले पाहिजे. त्यांच्याबद्दल आदराने बोलले पाहिजे, हे आपली जुनी पंरपरा आहे.
समाजाला टार्गेट करू नका
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कुठल्या एका समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीने वाईट कृत्य केले तर त्यासाठी संपूर्ण समाजाला गृहित धरणे चुकीचे आहे. ती त्या व्यक्तीची एकट्याची विकृती म्हणता येईल.
जनतेचा पैसा जाहिरातीवर खर्च होतोय
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारकडे सध्या सरकारकडे दुसरे काही मुद्दे राहिले नाही. जाहिरात बाजी करुन आपला माल विकावा लागतोय. जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी सुरू आहे. सरकारच्या योजनेच्या जाहिरातीवर आमचा आक्षेप नाही. मात्र केवळ जाहिरातबाजी करणे चुकीचे आहे. 100 कोटींच्यावर यावर्षी त्यावर खर्च करणे चुकीचे. आम्ही 1999, 2004, 2009,मध्ये सत्तेत आलो, मात्र कधी जाहिरात केली नाही. काम चांगले असले की जाहीरात करण्याची गरज पडत नाही.
दंगली प्रकरणी तपास करा
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. अनिल बोंडें यांनी ते सत्तेत आहे, हे लक्षात ठेवत दंगलीबद्दल तपास करावा, आणि दुध का दुध आणि पाणी का पाणी लोकांसमोर येऊ द्यावे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.