आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा CMशिंदेंना सल्ला:सीमावादावर ​​​​​​​कर्नाटकच्या सीएमसारखीच आक्रमक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही घ्यावी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्यमंत्री सीमावादावर जशी आक्रमक भूमिका घेतात, तसे आपल्या मुख्यमंत्र्यांनीही तशी भूमिका घ्यायला हवी अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

केंद्राने हस्तक्षेप करावा

अजित पवार म्हणाले, कर्नाटक - महाराष्ट्र सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा. केंद्र सरकारच्याच विचारांचे दोन्ही राज्यात सरकार आहेत. सीमावाद आणि त्यातून जे प्रकार घडत आहेत ते भारताच्या एकसंघतेला, संविधानाला धक्का लावणारी बाब आहेत. त्यातून वेगळा मेसेज उभ्या भारतात जातो. त्यासाठी दोन्ही सरकारला केंद्राने हस्तक्षेप करून सूचना करायला हव्या.

काॅंग्रेसने लक्ष दिले नाही

अजित पवार म्हणाले, गुजरातेत भाजप आली परंतु दिल्ली, हिमाचलप्रदेशमध्ये काय झाले? जेवढे लक्ष काॅंग्रेसने द्यायला हवे होते तेवढे दिले नाही. हिमाचल प्रदेश, तामीळनाडूत सत्ताबदल दर पाच वर्षांना होत आले आहेत. हिमाचलप्रदेशात काॅंग्रेसला चांगला सपोर्ट मिळाला. अनेक काँग्रेस नेते हिमाचलमध्ये जात आहेत. तिथे आमदार पळवण्याची त्यांना भिती आहे.

भाजपने प्रकल्प पळवले

अजित पवार म्हणाले, दुसऱ्या राज्याचे मोठे प्रकल्प गुजरातेत नेण्याचे काम भाजपने केले. जिथे निवडणुका आहे तिथे प्रकल्प नेले जात आहेत. स्थानिकांना वाटते की, प्रकल्प आले आता नोकरी लागेल. त्यातून मतदानावेळी लाभ मिळतो.

मतविभागणीतून भाजपला फायदा

जेव्हा गुजरातेत भाजपविरोधात काॅंग्रेसने आणि आपने उमेदवार उभे केले. दोन्ही पक्षातील मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल असे भाकित व्यक्त केले जात होते. माध्यमांतही या चर्चा झाल्या. काॅंग्रेस आणि आपचे मतदान मिळूनही भाजपचेच जास्त मताधिक्क्य आहे. त्यामुळे एकहाती भाजपने गुजरातेत विजय मिळवला हे निश्चित आहे.

हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

मी अर्थमंत्री असताना काही बॅंकाबद्दल काही ऐकायला मिळाले आणि त्या बॅंका अडचणीत आल्या तर सरकारच्या कर्मचारी आणि पैसा अडचणीत येतील म्हणून ठाकरे सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला व राष्ट्रीयकृत बॅंकेला प्रथम प्राधान्य दिले गेले, पण आज जो उल्लेख झाला तर तीन बॅंकात कर्नाटक बॅंकेला स्थान मिळाले. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

बातम्या आणखी आहेत...