आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संजय राऊतांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे, हे कायदेमंडळ आहे, यांची परंपरा थोर आहे, चोरमंडळ म्हणायचा अधिकार कुणालाच नाही. असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. नियम, कायदे आणि संविधान सर्वांना सारखे आहे, कुणाला वेगळी ट्रीटमेंट देण्याची काही कारण नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, चॅनलवर बातमी दाखवित असताना थोडे समज गैरसमज होत असतात. मी वस्तुस्थिती काय हे तपासून काम करण्याचे सांगितले. लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या राज्यसभेच्या सदस्याने असे बोलणे मला मुळीच पटले नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन हातवर केले आहेत. योग्य निर्णय घेण्यात यावा कुणावर अन्याय होऊ नये असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सत्ताधारी असो की विरोधक यांच्यातील कुणीच या गोष्टीचे समर्थन केले नाही.
चोर मंडळ म्हणणे म्हणजे विधीमंडळातील प्रत्येकाचा अपमान असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. विधीमंडळ हे सर्वाेच्च सभागृह आहे, विधीमंडळात अनेक मोठ्या नेत्यांनी काम केले आहे. कुणी चुकलेले असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी असेही अजित पवारांनी म्हटले आहे. आज हक्कभंग कमिटीसाठी अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 काँग्रेसकडून 2 नावे मागविली होती. हे प्रकरण विशेष न्याय हक्क कमिटीकडे जाईल असे वाटते आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी असे जाहीर केेले नाही. ते हे प्रकरण समजून घेणार आहेत. यावर समिती योग्य निर्णय घेईल सभागृहासमोर आले की सभागृह योग्य निर्णय घेईल असे मला वाटते असे पवारांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारवर हल्लाबोल
गॅस दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होत आहे. जनतेचे कंबर मोडले आहे, आता छोटे व्यावसायिक जो गॅस वापरता त्यांचा दर 350 रुपयांनी वाढला आहे. यामुळे आता छोट्या व्यावसायिकाचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी महावितरणची विजतोडणी सुरू आहे. अनेक आमदारांनी हे आमच्या लक्षातज आणून दिल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.