आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्फी जावेद-चित्रा वाघ वादावर अजित पवारांची मिश्कील प्रतिक्रिया:म्हणाले- हे महिला महिलांच चाललं आहे, आम्ही तर उलट त्यांना संधी देतोय...!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याला उर्फीनेही प्रत्युत्तर दिल्यामुळे दोघींमधील वाद वाढला. त्यातच वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही या वादात ओढले. त्यावरून आयोगाने वाघ यांना नोटीस बजावली आहे. या वादाबाबत आता अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद जगजाहीर झाला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार, असा धमकीवजा इशाराही चित्रा वाघ यांनी तिला दिला आहे.

आम्ही महिलांना संधी देतो

चित्रा वाघ-उर्फी जावेद वादात सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. एकूणच संपूर्ण वाद महिलांमध्येच सुरु आहे. मात्र आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे महिला महिलांच चाललं आहे. आम्ही कोणी यात भाग घेतला का? आम्ही महिलांना संधी देतो. त्याची राख करायची का सोन हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, असे म्हणत अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.

अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

चित्रा वाघ-उर्फी जावेद वादाबाबत अमृता फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मी आत्ताच या वादाबाबत काहीही बोलणार नाही. आज माझ्या गाण्याबाबतच बोलेल असे म्हणत असतानाच या गाण्यावर सर्वांना नाचवा, उर्फीलाही नाचवा, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.

उर्फीला नव्हे विकृतीला विरोध

चित्रा वाघ म्हणाल्या, विरोध धर्माला नाही परंतु, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे त्या विकृतीला विरोध आहे. उर्फीला विरोध नाही तर तिच्या नंगा नाचला विरोध आहे. कुणी काय कपडे घालावे आणि कुणी घालू नये. यावर काय बोलावे. आधी कपडे तर घाला मग ठरवा.

चित्रा वाघ यांना नोटीस

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतल्याचेही चाकणकर यांनी म्हटले.

उर्फी वादावर महिला आयोगाचे स्पष्टीकरण

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतल्याचेही चाकणकर यांनी म्हटले. वाचा सविस्तर

उर्फीच्या वादातून जुन्या मैत्रिणींत तंटा

माॅडेल उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याला उर्फीनेही प्रत्युत्तर दिल्यामुळे दोघींमधील वाद वाढला. त्यातच वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही या वादात ओढले. त्यावरून आयोगाने वाघ यांना नोटीस बजावली. एकूणच उर्फीच्या वादातून एकेकाळच्या दोन मैत्रिणींत तेढ निर्माण झाली. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...