आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना नगरसेवक पक्षप्रवेश:मुख्यमंत्री कधीच नाराज नव्हते, शिवसेनेच्या 'त्या' पाच नगरसेवकांविषयी अजित पवारांनी केले पहिल्यांदाच केले भाष्य

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीत काहीच आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. मात्र या सर्व चर्चांनंतर पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. तसेच मुख्यमंत्री कधीच नाराज नव्हते असंही अजित पवार म्हणाले आहेत. 

अजित पवार या नगरसेवकांच्या विषयावर म्हणाले की, मी त्या दिवशी बारामतीच्या दौऱ्यावर होतो. त्या दिवशी माझ्या आजुबाजूला खूप गर्दी होती. मी सगळ्यांना सांगत होतो की, काळजी घ्या. त्या गर्दीमध्ये असताना काही वाहनं आली. यावेळी तिथे नीलेश लंकेही तिथे आले. मी त्यांना कामाविषयी विचराले. त्यावर लंके मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवकांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर येऊन त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि हा कार्यक्रम पार पडला. हे सर्व झाल्यानंतर मला माहिती झालं की, ते शिवसेनेचे नगरसेवक होते. यानंतर मी विचारलं असता ते म्हणाले की, दादा ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते. ते म्हणत होते की, राष्ट्रवादीनं घेतलं नाही, तर भाजपमध्ये प्रवेश करु. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही माणसांची फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी नीलेश लंके यांना बोलावून घेतलं. त्यांना याविषयी माहिती दिली. सारथीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी घेण्यात आलेल्या निर्णयाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

मुख्यमंत्री मला कधी बोललेच नाहीत....

यासोबतच शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचं बोललं जात होते. यासाठी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना फोन करुन नगरसेवक परत पाठवा असेही म्हटले असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले की, मला ते नगरसेवक शिवसेनेचे होते हे माहिती झाल्यानंतर त्या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मी पाठवले. तुमच्यावर काही अन्याय झाला असेल, किंवा तुमचं काही म्हणण असेल तर तुमचे वरिष्ठ सोडवतील, असं त्यांना सांगण्यात आले. या बाबतीत कधीही मुख्यमंत्री नाराज नव्हते. ते मला कधीही ते बोलले नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser