आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती'वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी मला पुस्तक वाचू द्या, नंतर मत व्यक्त करेन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी अजून 'लोक माझे सांगाती'ची नवीन आवृत्ती असलेले पुस्तक वाचलेले नाही. आधी मला पुस्तक वाचू द्या, असे म्हणत शरद पवारांच्या पुस्तकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जास्त भाष्य करणे टाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज झाले. यावर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा सोहळा झाला. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019 नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे.

आवृत्तीबाबत उत्सुकता

भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली? आणि महाविकास आघाडीची निर्मिती कशी झाली?, यावर शरद पवारांनी सुधारित आवृत्तीत महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर येत आहे. तसेच, याशिवाय 2019 नंतरच्या अत्यंत महत्त्वा‍च्या घडामोडींवरही शरद पवार यांनी या आवृत्तीत भाष्य केल्याचे समजते. त्यामुळे या आवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

पहाटेचा शपथविधी

'लोक माझे सांगाती'मधील एक पान.
'लोक माझे सांगाती'मधील एक पान.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

मला पुस्तक वाचू द्या

अजित पवारांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवार म्हणाले, पहिल्यांदा मला पुस्तक वाचू द्या. मी पुस्तक वाचलेले नसताना यावर प्रतिक्रिया कशी देणार? मी काही बोललो तर त्याची तुम्ही लगेच बातमी करणार. सगळे लोक हे ऐकत असतात. मला आधी पुुस्तक वाचू द्या. त्यानंतर मी मााझे मत व्यक्त करेल.

संबंधित वृत्त

लोक माझे सांगाती:अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर, घडलेलं धक्कादायक होतं; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे प्रथमच भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर