आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकार कोणतीच निवडणूक घेत नाही. का निवडणूक जाहीर करत नाही, शिंदे-फडणवीसांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्हावे वाटले. मग मनपा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका न लावता प्रशासकाच्या हातात सर्व कारभार देण्यात आला आहे. इतर लोकांना वाटत नसेल का आपण लोकप्रतिनिधी व्हावे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारला मस्तवालपणा आलाय. सरकार महापालिका, नगरपालिकाच्या निवडणुका का जाहीर करत नाही. निवडणुकाची भीती सरकारला कशासाठी आहे? निवडणुका जाहीर झाल्या, तर जनता काय करेल याची भीती वाटते. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपंसुक म्हटले. असे कोणत्याही सरकारला म्हटले नाही. मात्र, याचे सरकारला काहीही वाटत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
मुंबईतील वज्रमूठ सभेतून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनेकांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी बलिदान दिले. शिवसेनेमुळे मुंबई टीकली, शिवसेनेमुळे मराठी माणसाचा स्वाभिमान टिकून राहिला आहे. हे काही लोकांव्च्या डोळ्यावर आले आहे.
बळीराजाला आधार देण्याची गरज
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील बळीराज्याला आधारी देण्याचे काम बापल्यालास केले पाहिजे. राज्य सरकार कोणतीच निवडणूक घेत नाही. का निवडणूक जाहीर करत नाही, शिंदे-फडणवीसांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्हावे वाटले. मग मनपा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका न लावता प्रशासकाच्या हातात सर्व कारभार देण्यात आला आहे. इतर लोकांना वाटत नसेल का आपण लोकप्रतिनिधी व्हावे, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
कोर्टाची सरकारवर टीका
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने या सरकार नपुंसक आहे, असे म्हटले होते. राज्य सरकारला याची सुद्धा लाज वाटत नाही? सुप्रीम कोर्टाने कोणत्याच राज्य सरकारवर अशी टीका केली नव्हती.
घोटाळा करुन मुख्यमंत्री
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, अलीकडील 6 महिन्यात मुख्यमंत्री कितीदा चुकले हे मी पाहिले. साडेतीनशे 50 मेट्रो लाईन टाकली असे एमपीएससी आणि निवडणूक आयोग यात घोटाळा केला. तसे घोटाळा करूनच ते मुख्यमंत्री झाले आहेत.
मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मूर्मू म्हणतात. देशाचे पंतप्रधान मुर्मू आहेत? मुंबईत साडेतीशने कोटी रेल्वे लाइन टाकले म्हणाले. तुम्हाला जमेत नसेल, तर नोट वाचून दाखवा. मागेही एमपीएसीत असाच घोटाळा करून टाकला. कारण ते घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
उमेदवारीसाठी समजूतदारपणा दाखवावा
अजित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा जो निवडून येईल त्याला मविआची उमेदवारी देऊ असे अजित पवारांनी म्हटले आहे. तर टिल्ले टिल्ले लोक काही ही बोलत असतात असा टीका नीतेश राणेंवर अजित पवारांनी केली आहे. तर राजू शेट्टी यांच्या बदलीच्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की सर्व काही मंत्रालयातून हालचाली सुरू आहेत.
जाहिरातीवर मोठा खर्च
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरेंच्या काळात किती पैसा जाहिरातीवर खर्च केला आणि या सरकारने किती पैसा जनतेचा खर्च केला हे पाहायला हवे असे अजित पवारांनी म्हटले आहे. पर्यटन विभागाने काल जाहिरात दिली. देखो आपला महाराष्ट्र. या सरकारला मराठी भाषेची अडचण निर्माण झाली आहे का? हे देखो कुठले काढले? पाहा आपला महाराष्ट्र म्हणा ना. आता यांनाच पाहायची वेळ आली आहे, असा इशारा यावेळी अजित पवार यांनी दिला.
महाराष्ट्राला नवा हिंद केसरी
अजित पवार म्हणाले की,जर 150 बैठका घेऊन सरकार पाडण्यात आले तर जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. खोट्या बातम्यावर लोकांनी विश्वास ठेऊ नये असेही अजित पवारांनी म्हटले आहे. मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा नवा हिंद केसरी महाराष्ट्राला मिळाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दीडशे बैठका घेतल्या. असे मी नाही, तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. असे सरकार तुम्ही पाडायला लागला, तर देशात लोकशाही कशी राहणार. सत्ता येते आणि जाते. मात्र, जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.आपल्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका, यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे, याला बळी पडू नका असे अजित पवारांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.