आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळात आमदार त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात पोटतिडकीने उपस्थित करत असतात. परंतु त्याचे उत्तर देण्यासाठी सभागृहात मंत्रीच उपस्थित नसल्याची गंभीर बाब मंगळवारी विधानसभेत उघड झाली. याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत संताप व्यक्त करत संबंधितांना कडक शब्दांत समज देण्याची मागणी केली. याप्रकरणी राज्य सरकारने योग्य दखल घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली. पवार म्हणाले, आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करून सदस्य सभागृहात येत असतात. मात्र, त्यांना उत्तर देण्यास कोणी नसेल तर याला काय म्हणायचे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.